महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शेगांव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश शेगोकार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगांव नगर परिषद निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रकाश एकनाथ शेगोकार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रचार कार्यलय उद्घाटन प्रसंगी जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुगले, खामगाव मतदार संघाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस नेते रशीद खाँ जमादार, दयाराम वानखडे, शहराध्यक्ष कैलास देशमुख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे,सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले..
