जळगाव जामोद प्रतिनिधी....
गेल्या दशकापासून अविरत समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महाबली फाउंडेशनच्या वतीने यंदा खांडवी येथील गरजूंसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.२७६ गरजू लाभार्थी: नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील सर्व गरजू वयोवृद्धांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. संस्थेने केवळ स्वेटर वाटप न करता, लाभार्थ्यांना ओसवाल (Oswal) सारख्या नामांकित कंपनीचे ब्रँडेड स्वेटर मिळावे यासाठी कटाक्षाने प्रयत्न केले. त्यामुळे, गरजूंचे समाधान वाढले.संस्थेने या कार्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च केला.संस्थेचे हे कार्य केवळ या एका उपक्रमापुरते मर्यादित नाही; तर यापूर्वीही संस्थेने असंख्य वेळा मोफत चष्मे वाटप, मोफत औषध आणि तपासणी शिबिरे, HIV एड्स ग्रस्त बालकांन साठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांसाठी वार्षिक देणगी, रक्तदान करणारे संस्थांसाठी वार्षिक देणगी यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले आहेत.यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवि पाचपोर, दीपक वाघ पाटील,माणिक खोद्रे, राम धाडे, गणेश वाघ, परमेश्वर फरपट, चैतन्य सारोकार, हर्षद सायखेडे, मनोज झाटे, मंगेश वाघ, योगेश ऊर्फ चिटू बावस्कर, राम लांडे, दत्ता भिवटे, सागर गणेश सह इतर सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
