भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक १ डिसेंबर रोजी भव्य प्रचार रॅली व जाहीर सभा...


 भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक १ डिसेंबर रोजी भव्य प्रचार रॅली व जाहीर सभा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद नगरपरिषद निवडणूक दिनांक २ डिसेंबर रोजी पार पडत असून त्यामुळे प्रचार मोहिमेला वेग आला असून, सर्वच राजकीय पक्ष सभा कॉर्नर सभा, रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला जात असून. दिनांक १ डिसेंबर सोमवार रोजी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दांडगे गणेश रामेश्वर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अंबडकार पुष्पा प्रभाकर, कोथळकार रमेश हिरामण, सोनोने गजानन कैलास, खिरोडकार रत्नप्रभा अरुण,डोबे रूपाली संतोष, पाटील कैलास मोतीराम, वंडाळे अजय प्रल्हाद, ताडे प्रिया सखाराम, हिस्सल राजू मारुती, येऊल प्रियंका उमेश, तायडे लता कृष्णराव, रघुवंशी सुनील रजपालसिंग, बावस्कर पुष्पा संजय, कपले राजेंद्र सोपान, वानखडे प्रिया अनिल, राजपूत परमानंद करनसिंग, नर्सेकर आशा शरदराव,खान शिरीन खान शाकीर खान,मानस्कर सुलभा गजानन 

या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालय दुर्गा चौक पासून सकाळी ९ वाजता भव्य रॅली व  जाहीर सभा दुपारी १२ वाजता दिनांक सोमवार१ डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या भव्य प्रचार रॅली व जाहीर सभेला आमदार डॉक्टर संजय कुटे संबोधित करणार असून या सभेला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते बंधू व भगिनी यासह शहरातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post