राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील जामली वन येथे २७/११/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय जमली वन येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये मोठया प्रमाणात या शिबिरात गावकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे चित्र दिसून आले आहे.जामली वन येथिल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी सलोना प्राथमिक आरोग्य् केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी श्री कंकाळे साहेब प स चिखलदरा चे आरोग्य विस्तार अधिकारी तथा नोडलं अधिकारी श्री भिलावेकर साहेब तसेच आरोग्य विस्तार अधिकारी श्री धुर्वे साहेब व आरोग्य विभागाची चमू यावेळी उपस्थित होते विशेष जामली वन येथे किशोरी वयांची मुलीची तपासणी करण्यात आली असुन या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी श्री.नरेद्र पिसे यांनी केले.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य गन व गावकरी हे होते.
