मंगल काकडे/पिंपळगाव काळे...
जळगाव जामोद तालुक्यातील तीर्थक्षेत्र धानोरा महासिद्ध, पळशी सुपो, खांडवी या ठिकाणचे ग्राम विकास अधिकारी विजय ढगे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जिल्हा परिषद मार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दिला जाणारा एक पुरस्कार आहे.दिनांक २/११/२०२५ रोजी बुलढाणा येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्या हस्ते विजय ढगे यांना वर्ष २०२३ ते २०२४ करिता आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार ग्रामसेवकांना दिला जाणारा एक पुरस्कार आहे हा पुरस्कार ग्रामसेवकांना त्यांच्या विकास कामाची आणि ग्रामविकासातील योगदानाची दखल घेऊन दिला जातो आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी असतो या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामसेवकांना अनेक फायदे मिळतात जसे की वेतन वाढीसारखे आर्थिक लाभ आणि सन्मान, व शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहचवणे आणि गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या ग्रामसेवकांना सन्मानित करणे या पुरस्काराचे मुख्य हेतू आहे.ग्रामस्तरावर उत्कृष्ट कामाची दखल घेत जिल्हा परिषद स्तरावर हा पुरस्कार बुलढाणा येथे ग्रामविकास अधिकारी विजय ढगे यांना जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी खरात, खासदार प्रतापराव जाधव, संदिप मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामोद, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, सामान्य प्रशासन विभाग इत्यादी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
