जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत नगद रक्कम ११ हजार ७२० रूपये, दहा अँड्रॉइड मोबाईल किंमत ९१ हजार रुपये,४ मोटरसायकली किंमत २ लाख रुपये असा एकूण ३ लाख २७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक २ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. ही कारवाई जळगाव जामोद शहरातील पाटील नगरचे बाजूच्या देविदास मेथे यांच्या शेतामध्ये करण्यात आली. या जुगार अड्ड्यावरील कारवाईत भास्कर काशीराम येऊल वय ४० वर्ष, गजानन विजयसिंह परिहार वय ४९ वर्ष, सुरेश पुंडलिक उगले वय ५९ वर्ष, संदीप विष्णू बुले वय ३३ वर्ष, गजानन नारायण भोपळे वय ४० वर्ष,विलास मनोहर उमाळे वय ४३ वर्ष, अजय सिताराम अंबडकार वय ३० वर्ष, अशोक पुंजाजी गव्हाळे ५० वर्ष सर्व राहणार जळगाव जामोद, दिलीप रमेश भोसले वय २५ वर्ष राहणार वाडी तालुका जळगाव जामोद, विनोद विद्याचंदन जयस्वाल वय ४५ वर्ष राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश हे सर्व पैशाच्या हार जीतवर एक्का बादशहा नावाचा ५२ ताशपत्ती जुगार खेळताना आढळून आले असून या दहाही जणांच्या ताब्यातून नगद रक्कम ११ हजार ७२० रूपये, दहा अँड्रॉइड मोबाईल किंमत ९१ हजार रुपये,४ मोटरसायकली किंमत २ लाख रुपये असा एकूण ३ लाख २७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या आदेशाने जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल धंन्दर, परमेश्वर ढोण, स्वप्निल मस्के, स्वप्निल झुंजारकर यांनी केली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहे.
