विकासपर्व आणि निष्ठेचा सन्मान संजय कुटे साहेबांचे 'डबल इंजिन' व्हिजन...!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
"एकीकडे शहराचा कायापालट करणारा 'विकास', तर दुसरीकडे गणेश दांडगे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिलेला 'सन्मान'... हेच आहे आमचे बलस्थान!"आमदार संजय कुटे साहेबांनी गणेश दांडगे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन केवळ एका व्यक्तीचा सन्मान केला नाही, तर त्यामागे मागील कार्यकाळात केलेल्या भक्कम विकासाचा पायाही आहे. भावनेला कर्तृत्वाची जोड असेल, तरच परिवर्तन घडते, हे साहेबांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे.मागील कार्यकाळात शहराचे रूप पालटले आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. कुटे साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेली कामे आज जनतेच्या डोळ्यासमोर आहेत."पाणी हेच जीवन" हे ओळखून शहराची तहान भागवण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजनांवर भर दिला. माता-भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्याचे पुण्य कर्म साहेबांच्या नेतृत्वात झाले.शहराचे प्रवेशद्वार असो किंवा मुख्य चौक, आज शहराला एक नवीन आणि आधुनिक ओळख मिळाली आहे. प्रशासकीय इमारती आणि सोयीसुविधांमुळे शहराचा दर्जा उंचावला आहे.एवढा प्रचंड विकास केल्यानंतर आता हा वेग असाच कायम ठेवायचा असेल, तर नगरपरिषदेतही त्याच विचाराचा, साहेबांच्या विश्वासातला आणि सर्वसामान्यांची जाण असलेला माणूस हवा.गणेश दांडगे हे केवळ उमेदवार नाहीत, तर एका संघर्षाचे नाव आहे. ज्याच्या पाठीशी कोणताही राजकीय वारसा नाही, गॉडफादर नाही, अशा एका पोरक्या मुलाला साहेबांनी 'नगरपिता' होण्याची संधी दिली आहे. गणेश दांडगे हे कुटे साहेबांनी सुरू केलेला विकासाचा हा यज्ञ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत.विरोधकांकडे ना दाखवायला काम आहे, ना कार्यकर्त्यांवर प्रेम. पण आपल्याकडे 'कुटे साहेबांचा विकास' आणि 'गणेश दांडगेंची निष्ठा' हे दोन्ही आहेत. त्यामुळे जनतेला विश्वास आहे की, जर साहेबांनी सामान्य घरातल्या मुलाला संधी दिली आहे, तर त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारीही साहेबांचीच आहे.शहरवासीयांनी आता ठरवलंय... ज्यांनी शहर सजवलं, रस्ते दिले, पाणी दिलं आणि आता गणेश दांडगे यांच्यासारख्या गरिबाच्या लेकराला उमेदवारी दिली, त्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं!
"विकासकामांची साक्ष आहे,
अन अन्यायावर मात आहे...
गणेश दांडगेंच्या पाठीशी,
संजय कुटे साहेबांचा हात आहे!"
चला, विकासाची ही गंगा अशीच प्रवाही ठेवण्यासाठी आणि गणेश दांडगे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करूया!
