जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद नगरपरिषद निवडणुक २०२५ दिनांक २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या दिवशी सामाजिक शांतता अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या असून, मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर रोजी होणार असून, जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक येथून पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बदल करण्यात आला असून ही सर्व वाहतूक दुर्गा चौक मार्गा कडून पोलीस स्टेशन कडे न जाता, दुर्गा चौक कॉर्नर वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोरून बस स्थानकाकडे वळविण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्रापासून पोलीस स्टेशन पर्यंत तसेच दुर्गा चौक पर्यंत माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक गृहविभाग कक्ष/४-२/कावि/४६२/२०२५ दिनांक २१.१२.२०२५ चे सकाळी ०६.०० वा. ते दिनांक ३०.१२.२०२५ चे २४.०० पावेतो संपुर्ण बुलडाणा जिल्हयामध्ये दोन्ही दिवस धरुन कलम ३७(१) (३) मपोका असे सुध्दा बुलडाणा जिल्हयाकरीता आदेश निर्गमित केले आहे.जळगांव जामोद सार्वत्रिक निवडणुक २०२५ मतमोजणीच्या दिवशी सामाजिक शांतता अबाधित राहावी याकरीता पोलीस स्टेशन जळगांव जामोद कडून नागरीकांना महत्वाचा सुचना करण्यात आल्या आहेत.
दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वा पासुन नगर परीषद जळगांव जामोद येथील योगा हॉल येथे मतमोजणी होणार असुन त्यासंबंधाने पोलीस स्टेशन जळगांव जामोद नगरपालिका निवडणुकीत उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे व नगर सेवक पदाचे तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना भारतीय न्यायसंहितेच्या कलम १६८ प्रमाणे नोटीस काढण्यात आली आहे.ती पुढील प्रमाणे...
१) कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुकीस परवनागी नाही.
२) डि.जे वादयास परवानगी नाही.
३) आक्षेपार्ह नारे घोषणा करणा-या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
४) फटाक्यांची आतेषबाजी करतांना नागरीकांच्या सुरक्षेतेस धोका निर्माण झाल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल
त्यामुळे विजयी नगराध्यक्ष, नगरसेवक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी केले आहे.
