जळगाव जामोद दि.२०
स्वच्छता व सामाजिक समतेचे पुजारी, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे आधुनिक युगातील महान संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करून त्यांना राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आदरांजली वाहण्यात आली.स्थानिक त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार ता जळगाव जामोद मधील राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केली. एक वेळ मोळी विका, कष्ट करा पण आपल्या मुलाबाळांना शिकवा असा मंत्र देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगणारे गाडगेबाबा यांच्या विचारांची आज गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रवींद्र निमकर्डे यांनी केले.
दिवसा गावातील कचरा,घाण साफ करून व सायंकाळी मानवाच्या अंतर्मनातील घाण साफ करणारे आदर्शवादी संत गाडगे हेच आपल्या समोरील आदर्श असल्याचे विचार आपल्या मनोगत आतूनविद्यार्थ्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे अवधूत म्हणून संत गाडगेबाबांच्या विचारांचा गौरव केला जातो. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता व शिक्षण हे सूत्र अंगीकारण्यासाठी करण्यासाठी पुढाकार घेतला. सदर कार्यक्रमाला प्रा माहेश्वरी वाघमारे, प्रा योगेश वारुकार, कुमारी अश्विनी गावंडे, नेहा वाकोडे, साक्षी जाधव, निखिल तायडे, विकास तायडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा शरद गावंडे यांची उपस्थिती होती.
