सुनगाव येथे महाविस्तार ए आय ॲप बाबत जनजागृती मोहीम; आधुनिक तंत्रज्ञानाची मिळणार जोड...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषी विभागाने महाविस्तार एआय हे नवे मोबाईल ऍप लॉन्च करण्यात आले. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना शेती संदर्भातील महत्त्वाची माहिती उपलब्ध होणार आहे.या ॲपचा वापर वाढवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनगाव येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यावेळी कृषी अधिकारी श्री गव्हाणे व कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी गावातील चौका चौकामध्ये जाऊन तसेच आदिवासी वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर ॲप मध्ये पेरणीपासून शेतमाल विक्रीपर्यंतचा सल्ला, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच पीक संरक्षण, हवामान अंदाज ,खत व्यवस्थापन ,बियाणे निवड, रोग व किड नियंत्रण,बाजारभाव अशा विविध सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या समस्यानुसार तत्काळ सल्ला देते या ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.सदर जनजागृती मोहीम यशस्वीतेसाठी कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले..

