वस्तापूर येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न — ११ शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग...


वस्तापूर येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न —  ११  शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वस्तापूर येथील केंद्र गोलखेड़ा बाजार अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव ४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास काळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच केवल झारकर, विस्तार अधिकारी अलका बांडे, मनोहर खडके आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रप्रमुख सविता भाकरें यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

११ शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.

या महोत्सवामध्ये केंद्रातील एकूण ११ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वस्तापूर, तेलखडा तसेच सोमवारवाडा यांसारख्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.


क्रीडा स्पर्धांमध्ये जोशपूर्ण खेळ.

केंद्रातील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सामूहिक आणि वैयक्तिक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्साहात सर्व खेळ खेळून उत्तम कौशल्य दाखविले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अंकुश राठोड यांनी तर आभार प्रदर्शन विषय शिक्षक किशोर सावळकर यांनी केले.

Previous Post Next Post