राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील काही वर्षांपासून परसापुर ते टेब्रुंसोंडा रस्ता चे काम प्रलंबित असुन या रस्त्यावर ये-जा करणारे वाहन चालकांना वाहन चालवताना या रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतु दि.५/१२/२०२५ ला प्रधान सचिव यांचा दौरा टेब्रुंसोंडा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला नागापुर ते बोराळा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.परंतु राजनेता व अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने येथिल रस्त्यावर काम करणारा कंत्राटदार हा या रस्त्यावर डांबर चा प्रमाण एकदम खुपच कमि टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बोलले जात आहे की येथिल कंत्राटदार रस्त्यावर डांबर न टाकता एकदम पहीले गिट्टी टाकत आहे.नतंर या गिट्टीवर आईल मिक्स डांबर टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरु असुन या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे येथिल कंत्राटदार या कामावर आपली मनमानी करत आहेत.अशा बोगस रित्या काम करणाऱ्या कंत्राटदारावर सक्तीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
