जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा पकडला..ठाणेदार नितीन पाटील यांची कामगिरी...आरोपीसह २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...


जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा पकडला..ठाणेदार नितीन पाटील यांची कामगिरी...आरोपीसह २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

जळगाव जामोद (दि.4)प्रतिनिधी....

जळगाव जामोद तालुक्यामध्ये ठाणेदार नितीन पाटील यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाईचा विडा उचलला असून तालुक्यातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अशीच एक कारवाई तालुक्यातील खांडवी फाट्या नजिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सातबारा असून नांदुरा रोडवर प्रतिबंधित पान मसाला व गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमाला मुद्देमालासह अटक केल्याची घटना दिनांक १ डिसेंबर रोजी दुपारी घडली. धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले ठाणेदार नितीन पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्याने पीएसआय नागेश खाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार, पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पुंडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत,सचिन शेळके,यांना सोबत घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी वय २४ वर्षे राहणार पिंपळगाव काळे यास प्रतिबंधित विमल पान मसाला घेऊन जाताना खांडवी फाट्यावर अटक करून त्याच्याकडून मोटरसायकल व मोबाईल यासह प्रतिबंधित असलेला गुटखा असा एकूण २ लाख ३५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी  अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे वय ५१ वर्ष यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी यांचे विरोधात अप क्रमांक ५७४/२०२५ अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(i)सहवाचन कलम २६(२)(iv),कलम २७(३)(D)२७(३)(E)कलम ३(१)(zz)(iv),५९ अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम २२३ कलम २७४,२७५,१२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नागेश खाडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार करीत आहेत.

Previous Post Next Post