नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. डॉ. संजय कुटे यांची SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीला भेट , विद्यार्थी मित्रांशी मनमोकळा संवाद...


 नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. डॉ. संजय कुटे यांची SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीला भेट , विद्यार्थी मित्रांशी मनमोकळा संवाद...

आर सी २४ न्युज नेटवर्क...

नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सकाळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी व SGB ऑफिसर्स पब्लिक स्कूलला भेट देत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला.महाराष्ट्रातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच IAS–IPS अधिकाऱ्यांना घडवणारी अग्रगण्य संस्था प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा पूर्वीपासूनच असल्याचे सांगत आ. डॉ. कुटे म्हणाले, “ही इच्छा आज पूर्ण झाली याचा मला मनस्वी आनंद आहे.”


अकॅडमीमध्ये आगमन होताच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लष्करी पद्धतीने केलेले स्वागत आणि ऑफिसर्स पब्लिक स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत पाहून ते अक्षरशः भावविवश झाले.संस्थेचे संस्थापक प्रा. नरेंद्र पालांदुरकर व प्राचार्या वंदना लुटे मॅडम यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आ. डॉ. कुटे यांचा सन्मान केला. या अभिवादनाचा त्यांनी मनापासून स्वीकार केला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. डॉ. कुटे म्हणाले“आपणच भारताच्या उज्ज्वल भविष्यातील अधिकारी आणि जबाबदार नागरिक आहात. 2047 पर्यंत भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. त्या शक्तिशाली राष्ट्राचे सक्षम घटक म्हणून आपण सिद्ध होत आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”

डॉ. कुटे यांनी संपूर्ण अकॅडमी परिसराची पाहणी करून येथे असलेल्या उत्कृष्ट सुविधा, शिस्तबद्ध वातावरण व दूरदृष्टीपूर्ण प्रशिक्षण पद्धतीचे कौतुक केले.जळगाव जामोद मतदारसंघातील सातपुड्याच्या पायथ्याशी अशाच दर्जाची डिफेन्स ट्रेनिंग संस्था उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधून संस्थेचा निरोप घेताना त्यांनी “देशसेवेसाठी सज्ज होत असलेल्या या तरुण पिढीकडून सकारात्मक ऊर्जा घेऊन परतलो” असे सांगत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post