तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार जुन्याच जागी ठेवण्याची नागरिकांची मागणी...


 तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार जुन्याच जागी ठेवण्याची नागरिकांची मागणी...

जळगाव जामोद |प्रतिनिधी....

जळगाव जामोद येथे उभारण्यात येत असलेल्या तहसील व उपविभागीय दंडाधिकारी (SDM) कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रवेशद्वार (गेट) पूर्वीच्या जुन्या ठिकाणीच ठेवण्यात यावा, अशी मागणी 30 जानेवारी 2026 स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आज नागरिकांच्या वतीने SDM साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे 70 ते 80 वर्षांपासून तहसील कार्यालयाचा हा मार्ग वापरात असून तो स्थानिक तसेच ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. या ठिकाणी प्रवेशद्वार असल्यास पार्किंगसाठी मोठी मोकळी जागा उपलब्ध असून, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, आश्रमशाळेच्या बाजूकडील नवीन मार्गावर जर प्रवेशद्वार उभारण्यात आले, तर त्या भागातील शाळा, महाविद्यालये तसेच रहिवासी वसाहतींमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्या परिसरात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक हित व नागरिकांची सोय लक्षात घेता तहसील व SDM कार्यालयाचा प्रवेशद्वार पूर्वीच्या जुन्याच ठिकाणी ठेवण्यात यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी बोलतानां संजय भुजबळ, डॉ शाकीर खान, समाधान दामधर, अरूण पारवे, सुहास वाघ, शेख नवेद यांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post