संघर्षातून मिळविलेल्या यशाची गोडी अवीट असते- डॉ. किशोर केला..जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण सुशीर यांचा बुलढाणा अर्बन तर्फे सत्कार...


 संघर्षातून मिळविलेल्या यशाची गोडी अवीट असते- डॉ. किशोर केला..जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण सुशीर यांचा बुलढाणा अर्बन तर्फे सत्कार...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या जळगाव जामोद सारख्या खेडेवजा शहरात संघर्ष करून जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या डॉक्टर श्रीकृष्ण श्रीराम सुशीर यांचे हे यश आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा असून त्यांनी संघर्षातून मिळवलेल्या या यशाची गोडी खरोखरच अविट असल्याचे प्रतिपादन बुलढाणा अर्बन चे संचालक डॉक्टर किशोर केला यांनी केले..जळगाव जामोद शहरातील स्थानिक निवासी आणि सध्या मध्य प्रदेशातील खंडवा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले जळगाव जामोद चे सुपुत्र डॉक्टर श्रीकृष्ण श्रीराम सुशिर यांनी  नुकतीच 27 फेब्रुवारी रोजी बुलढाणा अर्बन च्या जळगाव जामोद शाखेला सदिच्छा भेट दिली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर सुशिर यांनी बुलढाणा अर्बनच्या कामाचे कौतुक करून शिस्तबद्ध नियोजनाची प्रशंसा केली. त्यांच्या या सत्कार प्रसंगी जळगाव जामोद शाखेचे शाखा व्यवस्थापक योगेश जोशी, गजानन मालोकार, प्रसन्न गिरजापुरे, राधेश्याम चांडक, गजानन आंबुसकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर सुशीर यांचे वडील श्रीराम सुशीर तसेच शाखेचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते..

Previous Post Next Post