अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष (प्रतिनिधी):
जिल्हा कोषागार कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एकाच वेळी तीन शासकीय कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. कौटुंबिक पेन्शन मंजूर करण्याच्या नावाखाली १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना अपर कोषागार अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील तक्रारदाराचे वडील पोलीस विभागातून निवृत्त झाले होते, ज्यांचे २०२५ मध्ये निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची कौटुंबिक पेन्शन आईच्या नावे सुरू करण्यासाठी तक्रारदार जिल्हा कोषागार कार्यालयात चकरा मारत होते. मात्र, हे काम करून देण्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी २०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे तक्रार नोंदवली. २६ फेब्रुवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली, ज्यामध्ये तडजोडीअंती १५,००० रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार आज, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कोषागार कार्यालयातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारताना१.प्रविण गोविंदराव मोंढे (वय ४५) – अपर कोषागार अधिकारी, बुलढाणा (वर्ग-२).२. विनोद अब्बास घटटे (वय ४३) – कनिष्ठ लेखापाल/लिपिक (वर्ग-३).३.जीवन पांडुरंग काळे (वय ३४) – लेखा लिपिक (वर्ग-३).या तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा ACB चे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे, सहाय्यक फौजदार श्याम भांगे,पोहेकाँ प्रवीण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, सुभाष माटे, दिपक जाधव, अमोल झिने, पोलीस नाईक जगदीश पवार, पोलीस कॉन्स्टेबल रंजित व्यवहारे, शैलेश सोनवणे,लक्ष्मिकांत इंगळे,रतन गिरी,म.पोहेकाँ अनिता बारंगणे, स्वाती वाणी, नितीन शेटे, अर्शद शेख या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
आवाहन: जर कोणताही शासकीय लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याशी किंवा टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
