जळगाव जामोदचे नवनियुक्त नगरसेवक सैय्यद नफिस यांचा मुंबईत जंगी सत्कार..


 जळगाव जामोदचे नवनियुक्त नगरसेवक सैय्यद नफिस यांचा मुंबईत जंगी सत्कार..

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आणि जळगाव जामोद नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सैय्यद नफिस यांचा मुंबई येथील पक्ष कार्यालयात गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.​नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर सैय्यद नफिस यांनी नगरसेवक म्हणून मिळवलेले यश हे पक्षविस्तारासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील पक्षबांधणीवर विशेष चर्चा करण्यात आली.आमदार अबू आझमी यांनी सैय्यद नफिस यांच्या कार्याचे कौतुक केले.तसेच​"बुलढाणा जिल्ह्यात समाजवादी पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून, नवनियुक्त नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करावा असे आदेश दिले.​या सोहळ्याला समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने ​प्रवेश सिद्दिकी (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश),​लियाकत खान (सचिव, महाराष्ट्र प्रदेश),​गुंड्डू भाई  यांच्यासह मुंबई आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.​सैय्यद नफिस यांच्या निवडीमुळे आणि प्रदेशाध्यक्षांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जळगाव जामोद नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास करतानाच, संपूर्ण जिल्ह्यात समाजवादी पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचा निर्धार सैय्यद नफिस यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post Next Post