अकोला जिल्हा प्रतिनिधी...
नुकताच अमरावती येथे पारपडलेल्या महाराष्ट्र सर्पमित्र संमेलन निमित्त पारसच्या सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांना महिला सर्प मैत्रीण म्हणून पुरस्कार मिळाला. 16 फेब्रुवारी 2026 येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती जिल्हा सर्पमित्र समिती यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती मध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील धाडसी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील महिला ना सन्मान देण्यात आला. यावेळी पारसचा सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांच्या कार्याला पाहता हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रतिभा ठाकरे ह्या गृहिणी असून त्या वन्य जीव क्षेत्रात विशेष म्हणजे सर्पमैत्रीण म्हणून अकोला जिल्ह्यात कार्य करतात. प्रतिभाताई ठाकरे दहा वर्षापासून सर्प व वन्यजीव व तसेच संशोधन कार्य करीत असून गेल्यावर्षी मध्ये सरपटणाऱ्या जीव संबंधित आंतरराष्ट्रीय शोध निबंध रेपटाईल्स अँड एबेपिंन्स या शोधनिबंधा तुन अमेरिकेतून प्रकाशित (फास्ट रेकॉर्ड चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ) हा शोध निबंध प्रकाशित केला असून चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन सापाची नोंद करण्यात आली त्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले आहे तसेच अमेरिकेतील जागतिक दर्जाचा शौर्य सारख्या शोध निबंधात त्यांचे संशोधन आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय निलिमा कुमार खैरे,अशोक कॅप्टन,अशर खान,के. आर.अर्जुना यांच्या शुभहस्ते दीपक प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ठकसेन इंगोले,अभिजित दाणी,मिथिल कळबे,अक्षय चांबटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
