जळगांव जामोद प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडी तालुका जळगांव जामोद चे नेते अँड संदिप उगले यांनी काल दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कल गटामधील पिंपळगाव काळे येथे भव्य रोजगार मेळावा पांडव हॉलमध्ये आयोजित केला होता या मेळाव्याला उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद दामोदर हे होते,या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय किशोर गवई सर यांनी तर प्रास्ताविक मेळाव्याचे मुख्य आयोजक अँड संदीप यांनी केले आपल्या प्रास्ताविक मनोगतात अँड उगले म्हणाले की आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाले असून तरुण सुशिक्षित युवकांना सरकारी नोकरीत संधी उपलब्ध होत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून आपण या भव्य अशा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे, वंचित चे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, देवानंद दामोदर, सुनिल बोदडे,रतन नाईक,प्रा विजय सातव, विद्यार्थी आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांनी सुद्धा आपले विचार मांडले, यामध्ये नामांकित कंपन्या यांचे प्रतिनिधी बोलावून दहावी बारावी पासून उच्चशिक्षित तरुणांना त्या त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला या मेळाव्याला 368 तरुण बेरोजगार सुशिक्षित युवक युवती यांनी सहभाग नोंदविला अनेक तरुणांना नामांकित आय सि सि आय बँक, एचडिएफसी बँक, कोटक महिंद्रा,एसबिआय,लाईफ इन्शुरन्स, फार्मासिटिकल्स, ऑटोमोबाईल्स, हॉस्पिटिलिटि, टेलिकॉम कंपनीत नोकऱ्या मिळाल्या या कार्यक्रमाला पिंपळगाव काळे येथिल सरपंच अशोक ढोले, श्रीकृष्ण गवई सर,संचालक प्रभात पाटील, मंगल डोंगरदिवे, विजयकुमार तायडे, गुलाबराव आठवले, सुपा बांगर, नाना डोंगरदिवे, हरिभाऊ वाघमारे, प्रमोद कोकाटे,गजानन पाटील,अनुप महाले, पंजाब वाघ, ज्ञानेश्वर कोकाटे,गजानन बोदडे, सोपान पांडव ,भुषण महाले, दिनेश खरसने, बंटी उगले,श्रिराम भिडे , शैलेश दैय्या,नजिमभाई ,रोशन तायडे, आनंद गवई, दिलिप तायडे, अरुण आप्पा खांदे,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल उगले, दिलिप अवचार , सौरभ अवचार,शुभम पोटे, ज्ञानेश्वर झाल्टे, अमोल देवकर , वैभव चोखंडे,शिवा वरखडे, बंटी उगले,गौरव शेळके,नंदु हुरसाळ, निलेश हुरसाळ, नारायण मानकर,दिपक उगले, संतोष अहिर, प्रविण अवचार, फिरोज खान दिलिप राऊत सह अनेक कार्यकर्ते व मित्र परिवाराने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
