माणसा माणसांमध्ये संवाद साधण्यातूनच भाषेचे जतन आणि संवर्धन होते...!प्राचार्य शत्रुघ्न जाधव


 माणसा माणसांमध्ये संवाद साधण्यातूनच भाषेचे जतन आणि संवर्धन होते...!प्राचार्य शत्रुघ्न जाधव 

जळगाव जामोद/बुलढाणा:

मल्टीमीडिया असणारे या अत्याधुनिक काळामध्ये माणसा माणसा मधला संवाद हरवलेला आहे माणूस माणसाशी बोलताना दिसत नाही माणसाच्या हाती मोबाईल आल्यामुळे माणूस एकटेपणाकडे वळलेला आहे आणि भाषेच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी ही बाब अतिशय गंभीर आणि धोक्याची आहे असे मत प्राचार्य डॉ.शत्रुघ्न जाधव यांनी 27 फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य वक्ते  म्हणून व्यक्त केले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथील महाविद्यालयामध्ये 27 फेब्रुवारी 2026 रोजी "मराठी भाषा गौरव दिवस"  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी हे होते तर मुख्य अतिथी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल तसेच बी.एस. पटेल महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथील प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव , प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी मंचावर विराजमान होते. जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी मराठी भाषा गौरव दिवसा निमित्त सर्वच मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.डॉ.जाधव पुढे बोलताना म्हणाले की, माणूस हा समाजशील असून आणि समूहाने राहणारा असल्याने त्याला त्याच्या सर्वच गरजा या भाषेच्या माध्यमातून पूर्ण करायच्या असतात. अलीकडच्या काळामध्ये संवादात खंड पडलेला आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे.तर विद्यार्थ्यांनी वाचन आणि लेखनाकडे वळायला हवे तरच खऱ्या अर्थाने भाषिक समृद्धता प्राप्त होईल,असे मत प्राचार्य मायी सर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यातील विविध प्रवाहातील वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करून प्रगल्भ व्हायला पाहिजे, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रकाश गवई यांनी व्यक्त केले. याप्रसंगी "पोस्टर स्पर्धा"  आणि "मराठी गीत स्पर्धा"  आयोजित करण्यात आली होती या दोन्ही स्पर्धांमध्ये बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवलेला होता. या स्पर्धांचे परीक्षण इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी केले.   प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या रूपात बक्षीसे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सिद्धार्थ इंगळे यांनी केले.सूत्रसंचालन बीकॉम भाग 3 ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी बावस्कार हेने केले तर आभार प्रदर्शन प्रा. रामेश्वर सायखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ ऋषी विप्रदास, प्रा. आकाश निलजे, प्रा. सचिन उनटकट, प्रा. विनय उमरकर, प्रा. विठोबा देठे प्रा.समीर तडवी, प्रा.अभिजीत माटे, गजानन वानखडे,समाधान निलजे, वैभव घुले,धुंदले, गायत्री ढगे, दिव्या खराटे,अश्विनी इंगळे, वृषाली कुलकर्णी, ज्ञानेश्वरी बावस्कार, वैष्णवी उकरडेआणि मराठी अभ्यास मंडळातील सर्वच पदाधिकारी तथा सदस्यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Previous Post Next Post