गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी व पदभ्रमंती....


 गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी व पदभ्रमंती....

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर साहेब यांनी शनिवार, दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी व पदभ्रमंती केली.सकाळी 6 वाजता मोझरी गावातून पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता सर्व अधिकारी किल्ल्यावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली.या प्रसंगी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरकराव, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोरोनकर, अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन सहारे, चिखलदरा नायब तहसीलदार सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघघाटे (अचलपूर), चिखलदरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाळ, DCF अग्रिम सैनी, DFO अनंत डिगोडे, ACF अक्षय तळपे, RFO युवनाते, वनपाल विनोद कासदेकर, तसेच वनरक्षक मयूर सानप, मलवार, बोरकर व मनीष ढाकुलकर आणि वनविभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती.यावेळी शिवा काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याचे महत्त्व व संरक्षणाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच मनीष ठाकूर कर यांनी जंगलातील व किल्ल्यामधील पक्ष्यांची माहिती दिली.ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

Previous Post Next Post