मेळघाटातील मजुरांचे कामा करीता शहरा कडे धाव.शाळेकरी मुलांचे नुकसान.मात्र राजनेता व अधिकारी झोपेत..आदिवासी लोंकाची होळी अंधारात...गानु सावलकर यांची प्रकृती खराब...


पंधरा ते विस दिवसा पासून नरेगा चे कामे बंद.मेळघाटातील मजुरांचे कामा करीता शहरा कडे धाव.शाळेकरी मुलांचे नुकसान.मात्र राजनेता व अधिकारी झोपेत..आदिवासी लोंकाची होळी अंधारात...गानु सावलकर यांची प्रकृती खराब...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा तालुका मेळघाटातील जवळपास १६० ग्रामपंचायतील नरेगा चे कामे तांत्रिक व pto यांच्या उपषोण मुळे काही दिवसा पासुन बंद आहे.परंतु या उपोषणामुळे आदिवासी लोंकाची होळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बोलले जात आहे की तांत्रिक यांचा उपोषण होयी प्रयत्न यांचा जवळचा काम काज पंचायत समिती स्तरावरुन दुसऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कडे सोपविण्यात यांवे अशी माग जोर धरत आहे.तसेच हिरदामल या गावाच्या ठिकाणी जय आदिवासी संघटनाचे अध्यक्ष गानु सावलकर यांचा उपोषणाचा तिसरा दिवस असुन सुद्धा आज पर्यंत मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे व अधिकारी वर्गाने यांनी भेट दिली नसल्याचे विशेष समजले जाते.तथापि नरगाचे काम बंद असल्याने मेळघाटातील पुष्कळ मजुर वर्ग आपल्या मुल बाळांना घेवून बाहेर गावी कामावर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्या मुळे शाळाकरी मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच गानु सावलकर यांचा उपोषणाचा तिसरा दिवस असुन त्यांना त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याला जबाबदार कोण असा प्रश्न मजुर वर्गात केला जात आहे.त्यामुळे येथे आरोग्य विभाग यांची गरज असल्याचे समजले जात आहे.

Previous Post Next Post