जळगाव जामोद (प्रतिनिधी)
जळगाव जामोद येथे रमजानच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांसाठी विशेष रमजान बाजार आयोजित करण्यात आला. हा उपक्रम अहसास फाउंडेशनतर्फे राबविण्यात आला. महिलांना पडद्यामध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर खरेदी करता यावी व रमजानमध्ये इबादतीवर अधिक लक्ष देता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.हा बाजार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत राणी पार्क येथे भरविण्यात आला. सर्व स्टॉल्स महिलांनीच लावले आणि खरेदीही महिलांनीच केली, ही या बाजाराची विशेष बाब ठरली.कपडे, मेकअप, ज्वेलरी, बांगड्या तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे होते. महिलांनी उत्साहाने खरेदी केली. शहरातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात नगरसेविका डॉ. समिना शाकीर खान, अंबरिन सदफ, गज़ल मॅडम, रेशमा इरफान शेख, फिरदोस एजाज देशमुख तसेच अहसास फाउंडेशनचे इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक व रचनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
