जळगाव जामोदमध्ये रमजान निमित्त बाजारपेठ रात्री १२ पर्यंत राहणार सुरू! ​ठाणेदार नितीन पाटील यांचे आश्वासन; नगरपरिषदेचे सभापती सै. नफिज़ सै. शफीक यांच्या निवेदनाची तातडीने दखल...



 जळगाव जामोदमध्ये रमजान निमित्त बाजारपेठ रात्री १२ पर्यंत राहणार सुरू..!
​ठाणेदार नितीन पाटील यांना नगरपरिषदेचे सभापती सै. नफिज़ सै. शफीक यांचे निवेदन...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत असून, या काळात मुस्लिम बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापारी प्रतिष्ठाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जळगाव जामोद नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सभापती सै. नफिज सै. शफिक यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज, १७ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर केले.

​निवेदनातील मुख्य मुद्दे:

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होत असते. उपवासामुळे (रोजा) महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना भर उन्हात घराबाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे अनेक नागरिक रात्री १० वाजेपर्यंत नमाज अदा केल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडतात.नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सुलभतेने करता यावी आणि व्यापारयांचीही गैरसोय होऊ नये, यासाठी रमजान महिन्यापुरती शहरातील सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती सै. नफिज सै. शफिक यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.हे निवेदन समाजवादी पार्टी, महाराष्ट्र आणि जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, जळगाव जामोद येथे देण्यात आले.

Previous Post Next Post