जय आदिवासी संघटनाचे अध्यक्ष गानुजी सावलकर यांच्या उपोषणाला यश...


 जय आदिवासी संघटनाचे अध्यक्ष गानुजी सावलकर यांच्या उपोषणाला यश...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील हिरदामल या गावाच्या ठिकाणी जय आदिवासी संघटनाचे अध्यक्ष गानुजी सावलकर यांनी दि.६/२/२०२६ पासून नरेगा चे कामे बंद असल्यामुळे यांनी आमरण उपोषणाला बसले होते.दि.९/२/२०२६ला ठिक १२ वाजताच्या दरम्यान मध्ये गानुजी सावलकर यांचा आमरण उपोषण सोडण्यात आले आहे.बोलल्या जात आहे की सतत चार दिवस उपोषणाला बसलेले गानुजी सावलकर यांनी मेळघाटातील ३२ मुद्यावर ठाम होते परंतु चिखलदरा येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच अन्य अधिकारी तसेच अमरावती जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दयाराम काळे हे हिरदामल येथे उपोषणाच्या ठिकाणी पोहचले असता गानुजी सावलकर यांची प्रकृती खराब होत असल्याचे चित्र दिसून आले.तात्काळ तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ५४ ग्रामपंचायत चे नरेगा कामाचे मस्टर काढण्याकरीता आश्वासन दिले व आज दिवसी १७ ग्रामपंचायत चे मस्टर काढले असुन गानुजी सावलकर यांनी दयाराम काळे यांच्या हस्ते आमरण उपोषण सोडण्यात आले आहे.

Previous Post Next Post