साहेब आम्हाला घरकुल द्या हो,आम्हाला राहायला घर नाही..रामापूर येथील गरजू व गरीब कुटुंबाची शासनाकडे मागणी...


साहेब आम्हाला घरकुल द्या हो,आम्हाला राहायला घर नाही..रामापूर येथील गरजू व गरीब कुटुंबाची शासनाकडे मागणी...

सय्यद शकिल/अकोट....

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गट ग्राम पंचायत असलेल्या रामापूर येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण शामराव चामलाटे हे गेल्या ३० ते ४० वर्षा पासून रामापूर येथील रहिवाशी आहेत.परंतु आज पर्यंत सुध्दा यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही ही धक्कादायक बाब समोर आली आहे.वेळोवेळी घरकुलासाठी अर्ज करून सुध्दा आम्हाला घर मिळाले नाही. एवढच नव्हेतर आम्हाला आजरोजी राहायला सुध्दा घर नाही,अशी बिकट परिस्थिती या कुटुंबावर उद्भवलेली आहे.असे असताना मात्र हे कुटुंब गेल्या एक ते दीड वर्षभरा पासून सरपंच,ग्राम सेवक,सदस्य,यांचेकडे चकरा मारत,त्यांना विचारणा करीत आहे मात्र आश्वासना शिवाय दुसरे काहीच मिळाले नाही,तरी प्रत्यक्षात ही कुटुंब आज उघड्यावर आपला परिवारा सोबत त्याच मातीच्या पडक्या घरात राहत आहे.त्यांच्या कुटुंबात आई,पती,पत्नी,मुलगा,असे चार लोक कुटुंबात छातीला माती लावून त्याच अक्षरशः पूर्णपणे जीर्ण झालेल्या भिंती पडलेल्या पडक्या मातीच्या घरात राहत आहेत.तरी सुध्दा आज पर्यंत या गरीब व खरोखर गरजू असलेल्या कुटुंबाला आपल्या हक्काचे घर मिळाले नाही ही धक्कादायक बाब आहे. अ ब क ड घरकुलाची मंजूर यादी संपली,मात्र या कुटुंबाचे नाव कोणत्याच यादीत समावेश नसल्याचे यांना सांगण्यात येत आहे.परंतु या कुटुंबाला शासनाच्या हक्काच्या घरकुल योजने पासून डावलून वंचित ठेवण्यात का आले,यांना घरकुलाचा लाभ का मिळाला नाही,याला जबाबदार कोण याची चौकशी होऊन जबाबदार असलेल्या व्यक्ती विरुध्द कठोर कारवाई करून या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देऊन त्यांना ताबडतोब शासनाच्या हक्काचे घर योजनेतून राहायला घरकुल मिळवून द्यावे अशी मागणी आता सर्वत्र जोर धरू लागली आहे.रामापुरात आता पर्यंत कित्येक घरकुल मंजूर झाले काही बांधकाम पूर्ण झाले,तर काही बांधकाम सुरू आहेत,तर काही लाभार्थ्यांनी अजूनही बांधकाम सुरूच केलेले नाही,तर काही लाभार्थ्यांची घरे ही rcc पक्के असून सुध्दा अशाही लाभार्थ्यांची घरे मंजूर यादीत नावांचा समावेश करण्यात आला आहे.अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे.तरी वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब दखल घेऊन या गरीब व गरजू कुटुंबावर आलेल्या संकटाची पाहणी करून घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.आता वरिष्ठ अधिकारी हे दखल घेऊन काय करतात याकडे चामलाटे कुटुंबाचे लक्ष लागले आहे.न्याय न मिळाल्यास उपोषणाला सुध्दा बसू अशी माहिती अरुण चामलाटे यांनी दिली आहे.

घरकुल योजनेत सुरू असलेल्या गैर कारभाराची चौकशी होईल का.व गोर गरीब गरजू लाभार्थी डावलून मोठ मोठ्या धनदांडग्यांना जो लाभ देण्यात येत आहे हा थांबेल का.जबाबदार असलेल्या विरुद्ध कारवाई होईल का अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--प्रतिक्रिया--

मी ३० ते ४० वर्षा पासून रामापूर येथील रहिवाशी असून माझे घर मातीचे आहे.व ते घर सुध्दा पूर्णपणे पडले आहे.मला आजरोजी राहायला घर नाही.तरी सुध्दा मला हक्काचे घर मिळाले नाही व मी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहों तरी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन माझ्या घराची पाहणी करावी व मला घरकुल योजनेचा लाभ द्यावा.व मला घरकुला पासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकारी,कर्मचारी,यांच्यावर कारवाई करून मला न्याय द्यावा.

अरुण शामराव चामलाटे रामापूर

--प्रतिक्रिया--

रामापूर येथील मंजूर यादीत अरुण चामलाटे यांचे नाव नाही आहे.तरी आता आम्ही ऑनलाईन मध्ये त्यांचे नाव टाकलेले आहे अजून मंजुरात आलेली नाही

जानराव मोहाडे 

सचिव गट ग्राम पंचायत रामापूर

Previous Post Next Post