जळगाव जामोद(प्रतिनिधी):
पंचायत समिती जळगाव जामोद येथे विविध उपक्रमामुळे प्रसिद्ध असलेली पंचायत समिती मध्ये आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज पंचायत समिती कार्यालयामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
दैनंदिन शासकीय कामकाजात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून प्रत्येक विभागाच्या भगिनीच्या हस्ते दीपप्रज्वलन तथा मा जिजाऊ, माता सावित्री बाई फुले, माता रमाई, ताराबाई शिंदे यांचे प्रतिमाचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रात नांवलौकिक मिळवलेल्या कर्तृत्वावण महिला कर्मचारी यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, पंचायत समितीच्या इंजिनिअर, विस्तार अधिकारी सर्व कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गटविकास अधिकारी संदीप मोरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यावेळी म्हणाले की,कुटुंब आणि कार्यालय या दोन्ही आघाड्यांवर महिला अत्यंत समर्थपणे जबाबदारी पेलत आहेत. पंचायत समितीच्या विकासकामात महिला कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे.त्यांचा सन्मान करणे हे केवळ औपचारिकता नसून त्यांच्या कष्टाची ही एक छोटीशी पोचपावती आहे.या अभिनव उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासकीय प्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला दिनानिमित्त केलेला हा गौरव आमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे, अशा भावना यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त करून प्रथमच या कार्यालयात आम्हाला बोलावून आमचा सन्मान केला असून गटविकास अधिकाऱ्याचे आभार उपस्थित महिलांनी केले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक कसूरकर मॅडम ह्या होत्या, यावेळी अस्मिता क्षीरसागर शिक्षिका यांनी पंचायत समितीला फोटो भेट दिले व मनोगत व्यक्त केले, यावेळी शिक्षिका वैशाली धनंबर,ग्रामपंचायत अधिकारी कविता जनजाळकर, शिक्षिका अर्चना फिरके मॅडम, अरुणा कौलकार, शिक्षिका अलका गवई,भगत मॅडम, अंगणवाडी सेविका इंगळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तर ग्रामपंचायत अधिकारी रेखा सरोदे यांनी गायन करून कार्यक्रमाचो शोभा वाढवली,या कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी यांनी विशेष नियोजन करून सर्व सन्मानित महिला कर्मचाऱ्यांचे सन्मानचे नियोजन केले, सोबतच सर्व केंद्र प्रमुख, सहाय्य्क प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे, विशल नायसे, गणेश देशमुख हे उपस्थित होते, सिद्धार्थ भोजने यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले, सूत्र संचालन दीपक पसरटे यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख हागे यांनी यावेळी सकाळपासून पंचायत समिती कार्यालयात महिला अधिकारी कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले
