केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे जिद्द, प्रयत्न आणि कृतीयुक्त शिक्षणाचा संदेश देणारा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

 

केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे जिद्द, प्रयत्न आणि कृतीयुक्त शिक्षणाचा  संदेश देणारा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...यश हे मेहनतीचे फळ आहे, आणि बक्षीस त्या फळाची गोड चव आहे.

जळगांव जामोद (प्रतिनिधी):

स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे 28 मार्च 2026 शनिवारला विद्यार्थ्यांच्या गुणगौरव बक्षीस वितरणाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला सर तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. स्वातीताई किशोर केला मॅडम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक उमाळे सर,.विनोद ईश्वरे सर, राजेश लोहिया सर शाळेच्या पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मॅडम, मनीषा म्हसाळ मॅडम , शाळेचे विद्यार्थी मंत्रिमंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यामध्ये शारदा स्तवन चे गायन संगीत शिक्षिका वैष्णवी सातव मॅडम यांनी केले,  तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुल शर्मा मॅडम यांनी केले.या प्रसंगी बोलताना आदरणीय डॉ. केला सर यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आज मेहनत कराल तर तीच उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी ठरेल. तसेच खेळातील सहभाग किती महत्त्वाचा आहे हे प्रतिपादित केले व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि या बक्षीस वितरण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. तसेच आदरणीय डॉ. स्वातीताई किशोर केला यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या यश संपादनासाठी गौरवोद्गार काढले आणि भविष्यातील संधीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच बुलढाणा अर्बन परिवाराकडून जळगाव जामोद तालुक्यातील सर्व सर्प मित्राला साप पकडण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य देण्याचे निर्धार करण्यात आला याप्रसंगी शाळेतील सर्पमित्र किसन दातीर यास आवश्यक साहित्याचे वाटप केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे शर्मा मॅडम यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शाळेच्या शिक्षिका पारुल शर्मा मॅडम , शुभांगी बैरागी ,अमिता जाधव, अश्विनी भोजने मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post