जळगाव जामोद (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत 27 जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रासाठी BLA-1 (विधानसभा प्रमुख) पदावर श्री. निलेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दिनांक 26 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी असून, संबंधित जबाबदारी पार पाडण्यासाठी निलेश शर्मा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या नियुक्तीद्वारे विधानसभा क्षेत्रातील मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम अधिक प्रभावीपणे राबवले जाणार असून, स्थानिक स्तरावर संघटन बळकट करण्यास मदत होणार आहे. तसेच, BLA-2 पदांच्या नियुक्त्यांबाबत जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. निलेशदादा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे यांचे आभार व्यक्त केले.
