जळगाव जामोद(प्रतिनिधी):
स्थानिक श्री विठ्ठल मंदिर संस्थान आणि विश्व हिंदू परिषद - बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव नगरामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाडवा पहाट- स्वर तरंग हा सुमधुर भावभक्तीरसात्मक कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. स्थानिक दि न्यू इरा हायस्कूलच्या प्रांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमात स्थानिक गायक वादकांनी विविध प्रकारची भावगीते भक्ती गीते सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सुद्धा या कार्यक्रमात गीत गायन करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या सुविद्य पत्नी अपर्णाताई कुटे यांनी सुद्धा त्यांना गीत गायनामध्ये समर्थ साथ दिली. यावेळी अजय पुराणिक, मनोज सराफ, प्रमोद जोशी, किशोर धायडे, मुकुंद रोटे, सतीश कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी, विठ्ठल घुले, नागेश मुळे इत्यादी गायक वादकांनी आपली गायन-वादन सेवा सादर केली.या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर निवेदन गायत्री विप्रदास व विशाखा गोसावी यांनी केले.या कार्यक्रमासाठी नगरातील बहुतांश संगीत प्रेमी पुरुष मंडळी तसेच माता-भगिनी उपस्थित होत्या.
