हिवरखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती: 'वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल'चे दिमाखदार उद्घाटन!केवळ पदव्या नको, तर संस्कारक्षम व कौशल्यपूर्ण पिढी घडवा नगराध्यक्षा सुलभाताई दुतोंडे...


 हिवरखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती: 'वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल'चे दिमाखदार उद्घाटन!केवळ पदव्या नको, तर संस्कारक्षम व कौशल्यपूर्ण पिढी घडवा नगराध्यक्षा सुलभाताई दुतोंडे...

प्रशांत भोपळे ​/हिवरखेड (विशेष प्रतिनिधी):

ग्रामीण भागातील मुलांच्या डोळ्यांत जागतिक दर्जाच्या शिक्षणाचे स्वप्न फुलवण्यासाठी आकांक्षा शिक्षण संस्था, हिवरखेड द्वारा संचलित वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल चा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याने हिवरखेडच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, परिसरातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना हिवरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुलभाताई रमेश दुतोंडे म्हणाल्या की, "आजच्या धावपळीच्या युगात केवळ पदव्या मिळवणे पुरेसे नाही. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी बालक हे संस्कारक्षम आणि कौशल्यपूर्ण अभ्यासू असणे गरजेचे आहे. वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून अशाच गुणवंत विद्यार्थ्यांची फळी निर्माण व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे."कार्यक्रमाचे उद्घाटन नलिनी बंडू लहाने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमिला रवींद्र मानकर सभापती, महिला व बालकल्याण, वंदना राजेश वानखडे सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती, अनिता रवींद्र वाकोडे उपसभापती, महिला व बालकल्याण, वैशाली गणेश वानखडे नगरसेविका, आणि शाळा विकास समितीचे अध्यक्ष केवल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. मयूर लहाने यांनी शाळेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की या शाळेत केवळ अभ्यासक्रमच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत भौतिक सुविधा, डिजिटल क्लासरूम, प्रयोगशाळा आणि क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेच्या नावाप्रमाणेच प्रत्येक बालकाच्या उच्च शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या 'आकांक्षा' येथे पूर्ण होतील, याची आम्ही ग्वाही देतो.अभिमानास्पद बाब म्हणजे शाळा विकास समितीचे अध्यक्ष केवल देशमुख यांनी दाखविलेले सामाजिक दायित्व. केवळ नफा-तोटा न पाहता, ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी शाळेला स्वतःची हक्काची जागा उपलब्ध करून दिली असून, शाळेची भव्य इमारत बांधण्याचे संपूर्ण दायित्वही त्यांनी उचलले आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे हिवरखेडमध्ये एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल उभे राहणे शक्य झाले आहे.या कार्यक्रमाकरिता अतिथी म्हणून पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे, केंद्रप्रमुख गजानन राऊत, प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब नेरकर, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक शफाकत भाई, इंजि. राहुल मारोडे पॅनल, स्वीकृत नगरसेवक किरण सदानी, मुख्याध्यापक रमेश ठाकरे, डॉ. शंकर दूनघव, संतोष शर्मा, संजय शेंडे आणि नयन अग्रवाल यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून शाळेला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश वानखडे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. ज्ञानेश्वर अवचार यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी यश परनाटे, गोपाल इंगळे, प्रसाद विखे, रोहन कानतोडे, कृष्णा चांगील, माधुरी काळे, अरुणा बेदूरकार आणि उज्वला नेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.या सोहळ्याला आकांक्षा ग्राम संघ, महिला शक्ती प्रभाग संघ, सहारा ग्राम संघ आणि वसुंधरा ग्राम संघाचे पदाधिकारी, नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post