विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान... डॉ.किशोर केला.सहकार विद्या मंदिर मधील जेईई मेन्स व सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार..


 विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान... डॉ.किशोर केला.सहकार विद्या मंदिर मधील जेईई मेन्स व सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार..

जळगाव जामोद(प्रतिनिधी)

उत्कृष्ट शिक्षण आणि जिद्द व मेहनतीच्या जोरावर केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत असल्याने समाधान होत असल्याचे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांनी केले... सहकार विद्या मंदिर मध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या राम रोशन राठी या विद्यार्थ्यांने जेईइ मेन्स या परीक्षेत 99.92 परसेंटाइल तर कु.नेहा संतोष केला या विद्यार्थिनीने सीए फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन करून चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी प्राप्त केल्याने या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने 5 मार्च रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉक्टर किशोर केला बोलत होते... विद्यार्थ्यांच्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी शाळेच्या मुख्य संयोजीका डॉक्टर स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका अरुण व्यवहारे, मनीषा म्हसाळ यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते... शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि यशस्वी विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर मेहनतीची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये सातत्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात... तर शाळेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आदर्श व गुणवत्तापूर्ण जबाबदार नागरिक  निर्माण व्हावा या उद्देशाने संस्थेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला ह्या सातत्याने शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम रावीत असल्यामुळेच शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत असल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी बोलून दाखविल्या....

Previous Post Next Post