बी. एस. पटेल महाविद्यालयाचा करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धा 2025-26 मध्ये यशस्वी ठसा....


 बी. एस. पटेल महाविद्यालयाचा करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धा 2025-26 मध्ये यशस्वी ठसा...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या  करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धा 2025-26 मध्ये बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध गटांमध्ये पारितोषिके मिळवून महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली.जिल्हास्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक या गटात डॉ. प्राजक्ता निवृत्ती बाठे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय उत्कृष्ट करिअर संसद या गटात महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून आणखी एक मानाचा तुरा रोवला. याच कार्यक्रमांतर्गत करिअर कट्टा ९० दिवस उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग घेणाऱ्या कु. सानिया नाज यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.४ मार्च 2026,  रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे विभागीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मा. श्री. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) तसेच विभागीय प्राचार्य प्रवर्तक, अमरावती विभाग डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या हस्ते कार्यरत प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव  यांनी महाविद्यालयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र स्वीकारले.या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल साहेब, सहसचिव श्री. रब्बानीजी देशमुख तसेच  डॉ. शेख फराह यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश संपादन झाले असून सर्व स्तरांतून महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याचा संकल्प महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

Previous Post Next Post