ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांची प्रतिबंधीत गुटखा,अवैधरित्या पेट्रोल व डिझेल विक्री करणा-या आरोपीवर कायदेशीर कार्यवाही..एकुण १८,३२०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त..


 ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांची प्रतिबंधीत गुटखा,अवैधरित्या पेट्रोल व डिझेल विक्री करणा-या आरोपीवर कायदेशीर कार्यवाही..एकुण १८,३२०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त..

 सय्यद शकिल/अकोट

ऑपरेशन पहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत दि.५/३/२०२६ रोजी पेट्रोलींग करत असतांना गोपनीय माहिती मिळाली की ग्राम अकोली जहागीर ता.अकोट येथील वासुदेव गोविंदराव मेहरे हा गणेश किराणा दुकानामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेल्या पान मसाला गुटख्याची विक्री करीत आहे.अशा खात्री लायक बातमीवरून पंच व पो स्टाफसह आरोपी वासुदेव गोविंदराव मेहरे याचे किराणा दुकानची कायदेशीर झडती घेतली असता किराणा दुकानमध्ये १) जांभळया काळया रंगाचे विमल पानमसाला गुटखा एकुण ४९ सिलबंद पॉकीट प्रत्येकी किं.अं. १५०/रू. एकुण किंमत ७, ३५०/रू. २) निळया व काळया रंगाचे V-1 TABACCO चे एकुण ४९ सिलबंद पॉकीट प्रत्येकी कि. ३०/रू एकुण १४७०रू. असा एकुण ८,८२०/रू वा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व ३) एक निळया रंगाच्या प्लॉस्टीक कॅनमध्ये डिझेल ४० लिटर कि. अं ४,०००/रू. ४) एक लहान निळया रंगाच्या प्लॉस्टीक कॅनमध्ये डिझेल २० लिटर कि.अं. २,०००/रू. ५) एक निळया रंगाची मोठी कॅन त्यामध्ये पेट्रोल ३५ लिटर किअं ३५००/रू. असा एकुण ९,५००/रू असा एकुण १८,३२० / रू.वा मुद्देमाल पंचासमक्ष जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला. आरोपीचे सदरचे कृत्य हे कलम २२३,२७४,२७५,१२३ भा.न्या.सं.२०२३ सहकलम २६(२)(प)२६(२)(पअ)२७ (३) (क) (म) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम सहकलम ३०(२) (अ) सह अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषधे प्रशासन महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना महाराष्ट्र यांची अधि सुचना क. असुमाअ /अधिसुचना-३६९/७ दिनांक १५.०७.२०२० चे उल्लंघन करूनशिक्षा पात्र कलम ५९ अन्वये सह कलम ३,७ जिवनाश्यक वस्तु अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास पोउपनि वैभय तायडे हे करीत आहे.सदरची कारवाई मा.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,मा.अप्पर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,मा.सहा.पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  किशोर जुनघरे,पोउपनि वैभव तायडे, पोहेकों विबुल चव्हाण,पोहेकॉ मोहम्मद नौरंगाबादी,मपोहेकॉ गिता भांगे,पोकों पोकॉ शैलेश जाधव,पोकों शुभम लुंगे,चालक पोकॉ अमोल मस्के यांनी केली.

Previous Post Next Post