अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड नजीक येत असलेल्या अडगांव बु,येथील छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तिथीनुसार ६ मार्च ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण गावात शिवमय वातावरण झाले होते.संध्याकाळी ५ वाजता हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड, पोलीस पाटील हितेश हागे, छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंकज देशमुख, यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत जल्लोषात निघाली त्यामध्ये बँन्जो वाद्य पथक व महाकाल वाद्य पथक यांनी रग्गत भरली छत्रपती प्रतिष्ठानच्या शेकडो युवकांच्या सह संपूर्ण गावातील शिवप्रेमी सहभागी झाले होते ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मुर्तीचे पूजन करण्यात आले मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी अकोट उपविभागीय अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड,अडगांव बु पोलीस चौकी, यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
__६८ रक्तदात्यांचे 'रक्तदान' करून शिवरायांना अभिवादन__
येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ६८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांना आगळेवेगळे अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अकोला येथील ठाकरे ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील आणि पत्रकार बांधवांनी शिबिराला भेट देऊन प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक केले.दरवर्षी छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते त्यापैकी रक्तदान शिबीराला तरुणांचा आणि रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रतिष्ठानच्या या कौतुकास्पद कार्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
