भाजपच्या जळगाव जामोद शहराध्यक्षपदी अजय वंडाळे यांची नियुक्ती ...संघटन बळकटीस नवी ऊर्जा...
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
विविध हिंदुत्ववादी उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेले भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते अजय वंडाळे यांची भाजपच्या जळगाव जामोद शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार डॉ. संजय कुटे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या वंडाळे यांच्या नियुक्तीमुळे शहरातील भाजप संघटन अधिक सक्रिय व मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.आ. डॉ. संजय कुटे यांच्या सूचनेनुसार भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी २८ मार्च रोजी ही नियुक्ती जाहीर केली. वंडाळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.आपल्या नियुक्तीचे श्रेय अजय वंडाळे यांनी आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख तसेच विधानसभा बीएलए प्रमुख निलेश शर्मा यांना दिले आहे.
