राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यात पुष्कळ ठिकाणांच्या गावांत गॅबिन बधांरेचे कामे झाले व सुरु आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोंडा या गावाच्या बाजुला अंबापाटी रस्ताच्या बाजुला गॅबिन बंधाऱ्याचे कामे झाले आहे.परंतु या गॅबिन बंधाऱ्याच्या कामात त्या नाल्यातील माती मिक्स चोरीची वाळु वापरण्यात आली असल्याचे चित्र दिसून आले आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच या कामांमध्ये एकही अधिकारी उपस्थित नसुन हा काम कंत्राटदाराने आपल्या मनमानी केला असल्याचे समजले जात आहे.बोलले जात आहे की शासनाचा पैसा असल्याने पैसे चा वापर कसा बसा करुन व शासनाला काम दाखवून या गॅबिन बधांरेचे ५ते ७ लाख रुपये काढून अधिकाऱ्याचे टक्के वारी देवून आपले पोट भरावे अशी चर्चा टेब्रुसोंडा गावात रंगत आहे.हेच नव्हे तर जिल्हा परिषद टेब्रुसोंडा सर्कल मध्ये पुष्कळ गावाच्या ठिकाणी विविध बांधकाम विभाग तुन वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम सुरू असुन या सर्व बाधकामाची बातमी रोज न्युज वर प्रसारित करण्यात येणार आहे.तसेच या गॅबिन बंधाऱ्याच्या कामात कितपत अधिकारी लक्ष घालणार या कडे गावातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
