राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावाच्या बाजुला पिपरी टोपा जंगल असुन या जंगलात माती तलावाचे काम सुरु आहे.परंतु ईस्टंमेट प्रमाणे या तलवाचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे.बोलल्या जात आहे कि येथिल काम चादुर रेल्वे येथिल कंत्राटदार यांनी घेतला असुन हा काम पन्नास टक्के पुर्ण झाले आहे.परतु या कामात सुरवातीला काळी माती मध्यंतरी लाल माती नंतर काळी माती टाकली जात असल्याचे समजले जात आहे.बोलले जात आहे की याच काळी मातीच्या बाजुला मुरुम टाकले जाते परंतु या मुरम मध्ये मुरुम मिक्स दगड आपल्याला पाहण्यासाठी मिळते.तसेच या मातीच्या तलावाच्या कामावर पाणी टाकल्या जाते .परंतु असे काही होत नसुन दिवसातुन एकदाच गौलखेडा बाजार येथील टॅकंर मालक पाणी टाकत असल्याचे या टॅकंर मालकचे म्हणने आहे.तथापी या माती तलावाच्या कामात दगड मिक्स मुरुम चा वापर पण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याला जबाबदार कोण?
असा प्रश्न गौलखेडा बाजार येथील नागरीक करीत आहेत.
पुढची बातमी दुसऱ्या अंकात प्रसिद्ध होणार

