आ डॉ संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली खरीप पूर्व आढावा सभा जळगाव जामोद येथे संपन्न.शेतकरी बंधुनी कृषी विभागाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून आधुनिक शेती करावी - आ डॉ संजय कुटे


 आ डॉ संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली  खरीप पूर्व आढावा सभा जळगाव जामोद येथे संपन्न.शेतकरी बंधुनी कृषी विभागाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून आधुनिक शेती करावी - आ डॉ संजय कुटे

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

कृषी तंत्रज्ञानाचा जागर खरीप हंगाम मोहीम 2026 अंतर्गत योगा हॉल नगरपरिषद जळगाव जामोद येथे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंचावर तहसीलदार पवन पाटील,तहसीलदार प्रशांत पाटील,गटविकास अधिकारी पायघन आणि तांत्रिक मार्गदर्शक संजय उमाळे उपस्थित होते.येणाऱ्या काळात अलनिनो चा प्रभाव असणार आहे याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी बंधुनी कृषी क्षेत्रातील तज्ञ् व्यक्तीकडुन मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केली. आपल्या परिसरातील औषधी लागवडी कडे शेतकरी वळत आहे याचा मला आनंद आहे, शेतकरी बंधुनी याकडे वळावे आणि याबाबत असेलेल्या शासकीय योजनानांव्चा लाभ ही घ्यावा असेही ते म्हणाले,  येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बांधावर लवकरच जलसिंचन प्रकल्पतुन पाणी देण्यास मी कटीबद्ध आहे.  शेतकऱ्यांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे त्यातून नवीन नवीन प्रयोग होऊन शेती समृद्ध होऊ शकते तसेच आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण व्हाव्यात आणि शेती सुरळीत करता यावी याकरिता जोडधंदा पण शेतकरी बांधवानी वाढवला पाहीजे असा आग्रह ही त्यांनी यावेळी शेतकरी बांधवाना केले.यावेळी संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी बंधूना कृषी विभागातर्फे आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले. यावेळी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव,कृषीकेंद्र चालक आणि शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post