जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम वडगाव पाटण व गोळेगाव हुरसाळ या गावाला जाणारे मुख्य रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असून या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्यामुळे ही रस्ते पूर्णतः खड्डेमय झालेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळण करत असताना नेहमीसाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या नेहमीच्या त्रासाला कंटाळत काही ग्रामस्थांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना ही बाब सांगितली असता अक्षय पाटील यांनी आज दिनांक 22/4/2026 रोजी कार्यकर्त्यांसह जळगाव जामोद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून उपविभागीय अधिकारी तायडे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा व त्वरित या विषयाला गांभीर्याने घेऊन डांबरीकरणाचे काम चालू करावे अन्यथा ग्रामस्थांसमवेत रस्त्यार उतरू आंदोलन करू असा इशारा दिला.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, युवा तालुकाध्यक्ष अमोल बहादरे, संतोष पाटील, अवि पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
