सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
विश्वातील प्रत्येक मनुष्याचे कल्याण तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या धम्म मार्गानेच होते त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. व्यावहारिक दृष्टीने धम्म हा प्रत्येक मनुष्याच्या सुखासाठी आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या धम्माचे पालन केल्यानेच मनुष्य दुःखातून मुक्त होतो असे प्रतिपादन भंते ज्ञानरक्षित महाथेरो यांनी धम्मदेशना करताना केले. तालुक्यातील बोथाकाजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ट्रस्टचे अध्यक्ष पी.जे.हिवराळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महापुरुषांच्या जीवनावर आयुष संदीप हिवराळे, आरोही योगेश हिवराळे, आर्वी अविनाश हिवराळे हिवराळे, मोहित सतीश हिवराळे, वीर अमोल हिवराळे, क्षितिज संतोष अंभोरे, अश्विनी गौतम हिवराळे, विजया वानखडे या मुला मुलींनी भाषणे दिली.१८ एप्रिल रोजी भंते गुणरत्न महाथेरो नंदुरबार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर भंतेजी यांनी प्रवचनांमध्ये मानवाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना धम्माची नितांत गरज असते. त्याविना तो सुखी जीवन जगू शकत नाही.धम्माचा विविध अंगावर भंतेजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १९ एप्रिल रोजी समाजकार्य आणि धम्मकार्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. मुकुंद भारसाकळे, अशोक इंगळे, एस एम.पांडे, किरण खंडारे, धम्मबोधी डोंगरे, मनोहर वानखडे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव गणेश हिवराळे यांनी, सूत्रसंचालन सदानंद हिवराळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक पारवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, भिमशक्ती क्रीडा मंडळाचे,पंचशील महिला मंडळ, विशाखा महिला संघ,रमाई महिला संघ तथा बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले.
