जिल्हा बैठकीत संभाजी ब्रिगेडचा जोरदार विस्तार नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश...


 जिल्हा बैठकीत संभाजी ब्रिगेडचा जोरदार विस्तार नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश... 

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा बैठकीत नांदुरा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे संभाजी ब्रिगेडमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात संघटनेचा विस्तार अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.या वेळी शिवमती कविताताई घोपे यांची महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी, शिवमती मंगलाताई गर्दे यांची नांदुरा शहराध्यक्षपदी तर सविताताई बेलोकार यांची महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री योगेशदादा पाटील, जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील, जिल्हा सचिव मंगेशदादा सोळंके, ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद वानारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाटे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुमाळ, रामाभाऊ रोटे (तालुकाध्यक्ष, जळगाव जामोद), जिल्हा संघटक कुलदीप बेडकर, मा. आटोळे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, संतोष सोळंके, मा. मेजर संजय ससाने, रोशन चोपडे (तालुका सचिव), अमोल भगत (वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष), भागीरथ मनस्कार (तालुका उपाध्यक्ष) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर योगेशदादा पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत नवे विचार व प्रेरणा दिली. जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश सोळंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोशन चोपडे व दिलीप कोल्हे (तालुकाध्यक्ष, नांदुरा) यांनी मानले.या बैठकीमुळे नांदुरा तालुक्यात संभाजी ब्रिगेडची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा  तालुका अध्यक्ष यांनी विश्वास व्यक्त करण्यात आला. गाव तिथ शाखा उठ तरूणा जागा हो संभाजी ब्रिगेड चा धागा हो.

Previous Post Next Post