पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण..नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तहसील समोर उपोषणाचा इशारा...


 पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण..नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तहसील समोर उपोषणाचा इशारा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर च्या अंतर्गत येत असलेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग मलकापूर यांच्या वतीने जळगाव जामोद शहरालगत असलेल्या पद्मावती नदीवर 400 मीटर लांबीची गॅबियन संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे.. सदर बांधकाम अंतिम टप्प्यात असून नदीकाठची धूप थांबविणे आणि नदीलगतच्या नागरिकांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करणे या उद्देशाने ही संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे... परंतु या संरक्षक भिंतीमुळे नदीलगतच्या व परिसरातील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे...ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नदीपलीकडे ये जा करण्यासाठी भिंतीमध्ये आठ मीटर रुंदीचे अंतर तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले होते... परंतु सदर भिंत कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 20 मे रोजी एका बैठकीचे आयोजन करून जुना पिढ्यान पिठ्या वहीवाटी चा शेत रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.... त्यामुळे नदी लागतच्या खेल सोनजी, खामखेड, खेलबारी, खेल मूर्तिजापूर, सुनगाव भाग एक  व इतर शिवरातील परिसरातील शेतकऱ्यांना रस्त्या अभावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे... पद्मावती नदीवरील संरक्षक भिंत कायमस्वरूपी बंद केल्यास या भागातील शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यासाठी रस्ता उपलब्ध राहत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.. त्यामुळे हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येऊ नये यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने जळगाव  जामोद तहसीलदार व सहाय्यक अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग मलकापूर यांना मिटिंग मध्ये मागणी करण्यात आली लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.... यासंदर्भात प्रशासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन तात्काळ प्रश्न सोडवावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.... सदर निवेदन देते वेळी अमोल पांडुरंग केदार,श्रीराम येऊल,संतोष डोबे,महेंद्र बोडखे दिलीप केदार,कैलास मिसाळ ,कैलास पाटील रामभाऊ भुते, गजानन धांडे,संजय डोबे श्रीकृष्ण ढगे, पांडुरंग ढगे, पुंडलिक हांडे  यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते...

Previous Post Next Post