माजी जि. प.अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा बुलढाणा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सोमवारी पदग्रहण समारंभ..
मंगल काकडे/जळगाव जामोद;
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी व काँग्रेसची सदैव एकनिष्ठ असे एक व्यक्तिमत्व माजि जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या निवडीने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये उत्साहाचे वातावरण असून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांचा सोमवार दिनांक १ जून रोजी बुलढाणा येथील गांधी भवन येथे पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजि अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्षस्थानी राहणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती राहील तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, श्याम उमाळकर, संजय राठोड, राम विजय बुरुंगले, डॉ. स्वाती वाकेकर, रशीदखा जमादार, अँड. हरीश रावळ, लक्ष्मण घुमरे, डॉ. अरविंद कोलते, ज्ञानेश्वर पाटील, अँड संदीप शेळके, कासम गवळी, राजेश शेगोकार, अनंत वानखडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास काँग्रेस जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
