बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
लोकजन सोशलिस्ट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विरेंद्र विश्वकर्मा यांच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमा निमित्य उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुरुंगाव येथे एका भव्य स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी खामगांव येथील सतिफैल परीसरात राहनारे भारत गौरव पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा यांचे धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार. भारत गौरव पुरस्कार. विश्वकर्मा रत्न पुरस्कार. बहुजन रत्न पुरस्कार व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानीत झाले आहे तसेच विविध संस्था.मंडळे यांच्या वतीने सम्मानित झाले आहे अगदी साधी राहणीमान व उच्चविचाराचे गोर गरीबाच्या मदतीला नेहमी धावून येणारे समाजसेवक याचे कार्य पाहता ३ मे २०२६ रोजी त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लोकजन सोशलिस्ट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विरेंद्र विश्वकर्मा यांनी भारत गौरव पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा भगवे दपट्टे व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला व नंतर आस्थेने मंडळाच्या सेवाभावी कार्याची माहीती घेत पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या या प्रसंगी मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला हा सत्कार केवळ एक औपचारिकता नाही तर जनतेचा विश्वास सामाजिक एकतेचे प्रतीक होते या प्रसंगी डॉ विरेन्द्र विश्वकर्मा यांनी सांगितले की समाज सेवा. जनसेवा. गोर गरीब अनाथ लोकांसाठी कार्य करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक नवयुवकांचा सम्मान व सत्कार झालाच पाहीजे या प्रसंगी महेंद्र विश्वकर्मा. मिथुन विश्वकर्मा. अजय विश्वकर्मा. शुभम विश्वकर्मा. रामद्याल विश्वकर्मा. रितेश विश्वकर्मा. रमेश पटेल. धिरज सिंह. अमित विश्वकर्मा. शुभम विश्वकर्मा. व गावातील लोकांची उपस्थिती होती.
