जळगाव जामोद(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिरजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे."विज्ञान" शाखेतून 85 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच म्हणजे 85 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे.* *विज्ञान शाखेतून विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये 33 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी मध्ये 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. ऋतुजा गजानन वावगे या विद्यार्थिनीने पटकाविला असून तिला 86.17% गुण प्राप्त झाले आहे, तर द्वितीय क्रमांक कु.तन्वी शरद कुकडे हिचा आला असून तिला 85% गुण प्राप्त झाले आहे. तर तृतीय क्रमांक पार्थ नवनीत पाटील या विद्यार्थ्याला 84.83% गुण प्राप्त झाले आहे.तसेच "कला" शाखेतून 103 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचा एकूण निकाल 88.34% लागला असून विशेष प्राविण्य श्रेणीत 2 तर प्रथम श्रेणीत 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेतून प्रथम क्रमांक कु.अनम गोहर सलीम पटेल या विद्यार्थिनीने पटकाविला असून तिला 84.67% गुण प्राप्त झाले आहेत.विशेष म्हणजे तिला राज्यशास्त्र या विषयात 100 पैकी 99 गुण प्राप्त असून ती राज्यशास्त्र ह्या विषयात जिल्यात प्रथम आली आहे. तसेच तिला इतिहास विषयात सुद्धा 100 पैकी 88 गुण मिळाले आहेत.तर द्वितीय क्रमांक कु.हर्षाली राजेंद्र जाधव हिला 79.50% गुण प्राप्त झाले आहेत.तसेच तृतीय क्रमांक कु. श्रध्दा सुनील खवले हिला 72.83% मिळाले आहेत.त्याचबरोबर वाणिज्य शाखेतून 59 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 93.22% लागला आहे.वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु.पूजा महादेव काकडे हिचा आला असून तिला 80.50% प्राप्त झाले आहे.तर द्वितीय क्रमांक कु.प्राची जयपाल शेगोकार हिला 74.67% गुण प्राप्त झाले आहेत,तर तृतीय क्रमांक कु.अर्पिता रामभाऊ जाधव हिला 74.50% गुण प्राप्त झाले आहेत.महाविद्यालयाचा एकूण निकाल 93.52% लागला आहे.उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.ऍड. सलीम बापुमिया पटेल, उपाध्यक्ष प्रा.कय्युम पटेल, सचिव विजय अंभोरे,सहसचिव रब्बानी देशमुख, संचालक सिराजोद्दीन पटेल तथा सर्व संचालक मंडळ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य,मुकुंद इंगळे, प्राध्यापक व कर्मचारी. यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
