जळगाव जामोद(प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा निकाल आठ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.... यामध्ये जळगाव जामोद शहरातील सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत 100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे... सदर परीक्षेसाठी शाळेतील एकूण 59 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.. त्यामध्ये अकरा विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणीमध्ये 27, आणि द्वितीय श्रेणीमध्ये 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत... यामध्ये शाळेतील कुमारी पूर्वा सानंद भुमरे या विद्यार्थिनीला 95.80% गुण प्राप्त झाले असून तिने शाळेमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.. त्याचसोबत कुमारी श्रद्धा संतोष कुमार कतोरे 95.20% तर कुमारी श्रेया सुनील पाटील 95% गुण घेऊन शाळेमधून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले... शाळेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला तसेच प्राचार्य विनायक उमाळे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ, शिक्षक योगेश घुटे, नितीन बेंदरकर, साकेत गिरजापुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत...
