दहावीच्या निकालात सुद्धा सिद्धिविनायकची च बाजी...


दहावीच्या निकालात सुद्धा सिद्धिविनायकची च बाजी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

आज 8 मे 2026 रोजी लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या अवघ्या 55 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 12 विद्यार्थी 90 चे वर आणि दोन विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत...शेकडो विद्यार्थ्यांच्या गराड्यातून मोजक्याच निकालाची अनेक उदाहरणे आपण बघितलेली असतात पण मोजक्याच विद्यार्थ्यांमध्ये सर्वच्या सर्व निकाल अव्वल आल्यामुळे परिसरात अकॅडमीची स्तुती व चर्चा होत आहे...इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयात कुमारी स्नेहल उमाळे हिला 100/100 गुण व ओम अनिल ढगे याला 100/100 गुण मिळाल्यामुळे विज्ञानाचे रवी बोंबटकर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.तसेच इंग्रजी विषयात विक्रांत डोबे व गणित विषयात वैभव गावंडे यांचे विद्यार्थी सुद्धा अव्वल स्थानात आलेले आहेत...जळगाव च्या ग्रामीण भागात सिद्धीविनायक सायन्स अकॅडमी मध्ये मिळत असलेले डिजिटल एज्युकेशन, नियमित बॅचेस, डाऊट सॉल्विंग,  वेळोवेळी घेतलेले पेपर, आणि वर्षभर शिक्षकांनी घेतलेले मेहनत याचेच हे सर्व यश असून पुन्हा एकदा रिझल्ट म्हणजे सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी हे सिद्ध झाले. सिद्धिविनायक चे रिझल्ट पाहता सर्वत्र सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीचे पालकांकडून कौतुक होत आहे हे मात्र खरे...सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे ॲकॅडमी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.अकरावी व बारावी पाठोपाठ आता इयत्ता आठवी ते दहा मध्ये सुद्धा सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी हे निकालामध्ये अव्वल ठरत आहे..

Previous Post Next Post