जळगाव जामोद (प्रतिनिधी):
तर वायाळ सर, आल्हाट सर, ब्राह्मणे सर,धाडे सर,मरमर सर, सुरळकर सर,डी.आर इंगळे सर, गावंडे मॅडम, नाफडे मॅडम,वराडे सर आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक हेंडवे सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण त्या काळातले विद्यार्थी आहोत ज्या काळात आजच्या सारख्या मल्टीमीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध नव्हता परंतु अतिशय संवेदनशील व भावनिक नाते शिक्षकांसोबत तयार झाले होते आणि ते नाते आजही कायम आहे.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी उन्हातानात फिरावे लागत आहे. पण आपली शाळा मात्र याला पूर्णतः अपवाद आहे. आपल्या शाळेचा पी.एम.सी मध्ये समावेश झाला असून जिल्ह्यातून आपली शाळा प्रथम क्रमांक आली आहे एन एम एम एस मध्ये जिल्ह्यातून सर्वात जास्त निकाल सुद्धा आपल्या शाळेचा असतो शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात त्यामुळेच शाळेचा निकाल हा चांगला लागत आहे. आपली शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे.शाळेत सर्व सुविधा युक्त लॅब आणि वाचनालय आहे. गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीचे चांगले सहकार्य मिळत आहे, त्यामुळे आपल्या शाळेची पटसंख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज जिल्हा परिषदेची ही शाळा प्रत्येकाला आपली वाटत आहे.आपण सर्व विद्यार्थ्यांनी स्मृतिगंध या कार्यक्रमाचे छान नियोजन केले आहे. यापुढेही आपण कार्यक्रमाचे असेच आयोजन करत रहा तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी माझ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर चंद्रकांत खोद्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.पुरुषोत्तम अवचार, दीपक आराख, मंगेश भोपळे ,सागर झनके ,दीपक शेटे, राहुल बोराळे ,संतोष पांडे, चंद्रकांत खोद्रे,चंद्रकांत इंगळे, सोपान राऊत, संदीप उगले, विनोद टोंगलकार ,संदीप वाकोडे, शिवाजी अहिरकर, डॉ.स्मिता कोठारी, पुनम भैय्या,आरती बोडखे ,रेखा पदमण,योगिता अवचार,विद्य दिघे,आशा तायडे, सुनीता अवचार, मुग्धा कस्तुरे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले

